आठवण तुझी

Started by Vinod Thorat, August 20, 2016, 01:15:22 AM

Previous topic - Next topic

Vinod Thorat


आठवण तुझी
सूर्याच्या पहिल्या किरणासारखी
जीवनात नवी उमेद जागवणारी
फरक इतकाच
किरण धूसर होत जातात अस्ताला जाणऱ्या सूर्याबरोबर
तुझी आठवण मात्र गडद होत जाते
वाढणाऱ्या उत्तररात्रीबरोबर


आठवण तुझी
पावसाच्या पहिल्या सरीसारखी
मन रोमांचित करणारी
फरक इतकाच
सर विरून जाते पुथ्वीच्या पोटात 
तुझी आठवण मात्र दरवळत राहते
मातीच्या सुगंधासारखी 


आठवण तुझी
रात्रीच्या गडद काळोखासारखी
सर्वस्व व्यापून टाकणारी
फरक इतकाच
काळोख सरेलही सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर
तुझी आठवण मात्र तशीच राहील
उमलणाऱ्या प्राजक्तासारखी


आठवण तुझी
अगदी तुझ्यासारखी
काळजात घर करून राहणारी
फरक इतकाच
तू नाहीस आता
तुझी आठवण मात्र तशीच आहे
माझ्यातल्या तुझ्यासारखी


- विनोद थोरात, जुन्नर
मोब ८९८३४४८२१९