भाव

Started by Balaji lakhane, August 20, 2016, 01:12:15 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.......................भाव.....................

माझ्या भावना तुझ्या पर्यत,
तेव्हाच पोहचल्या असतील.! 
कविते मधल्या प्रत्येक शब्दात,
तू स्वतः लाच पाहिली असेल.!!

          जिवाहून अधिक प्रेम करतो,
          तूझ्यावर तुलाच समजल असेल.!
          फक्त तुला प्रेमाचे शब्द,
          ओठातून  काढायचे नसतील.!!

कधीशी ओळखल आहे गं,
सर्व काही तुझ्या मनातल.!
असे एक तरी दिवस,
येईल तू व्यक्त करशील मनातल.!!

          तुझीच प्रतीक्षा करत आहे,
          प्रिये गं माझे प्रिय ह्रदय.!
          कधीतरी नजरेतून नजरेन,
          बोलशिल तू सखे होय.!!

फक्त प्रत्येक कवितेत ,
तुलाच मी लिहीतोय.!
तुझ्या वरचे प्रेम आणि
ह्रदयातल्या भावना मांडतोय.!!

********************************
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
8888527304