तुझ्या आठवणीत जगतोय

Started by vikrams13, August 20, 2016, 06:23:42 PM

Previous topic - Next topic

vikrams13

तुझ्या आठवणीत जगतोय

मी अजूनही तिथेच आहे
अजूनही तुझी वाट पाहतोय
तू मला सहज सोडून गेलीस
मी मात्र तुझ्या आठवणीत जगतोय

कुणाच्या भावनांशी खेळणे
किती सोपे असेल ना तुझ्यासाठी
मी मात्र भांडत राहिलो जगाशी
फक्त तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी

आयुष्यभर तुझी साथ देईन
अशी तूच शपथ घेतली होतीस
मात्र तूच मला आयुष्याच्या
वाटेवर एकट्याला सोडून गेलीस

जाताना किती सहज म्हणालीस
तू मला आता विसरून जा
किती सोपे असेल तुझ्यासाठी दुसऱ्याच्या
भावानाशी खेळून त्याला सांगणे
तू मला विसरून जा

                   - विक्रम सरक
Vnsarak