जेव्हा ती माझ्या कविता वाचते

Started by vikrams13, August 21, 2016, 01:53:06 PM

Previous topic - Next topic

vikrams13


जेव्हा ती माझ्या कविता वाचते

मी तिच्यावर केलेल्या
कविता काल वाचल्या तिने
आपोआप तिच्या डोळ्यातून अश्रू
आले काय विचार केला काय माहित तिने

रडत रडत ती वेडी म्हणते प्लिज
अशा कविता करू नको ना रे
तूज्या  अशा कविता वाचल्या कि
मनाला खूप त्रास होतो रे

मग मी हि तिला बोलून टाकले
फक्त कविता वाचून तुला त्रास होतो
मला ही अशा विरह कविता तयार
करताना , तुला आठवताना
तुझ्यापेक्षा  जास्त त्रास होतो

शेवटी तिला विचारले
तुला हि वाटते ना हा त्रास
ना तुला हि नको ना मला
मग परत एकत्र येण्याचा
विचार कसा वाटतो तुला

ती वेडी गालात हसली जराशी
लाजली आणी म्हणाली
मी तुझ्या नाही तर तुझ्या
कवितेच्या प्रेमात पडली आहे

            - विक्रम सरक
Vnsarak