तेव्हा तुझी आठवण येते !

Started by Asu@16, August 21, 2016, 02:05:12 PM

Previous topic - Next topic

Asu@16

 तेव्हा तुझी आठवण येते !

थकला थकला दिस डोंगरी
मंजुळ नाद दूर मंदिरी
झुळूक होऊन कानी येते
लाल गुलाबी प्रणय सागरी
पाखरू घरटी झेप घेते
            तेव्हा तुझी आठवण येते ....

गंध रात्री धुंद अंधारी
आकाशाच्या निळ्या अंगणी
चांदण्यांची मैफिल जमते
रात्रीच्या कुशीत झोपून
धरा जेव्हा गीत गाते
             तेव्हा तुझी आठवण येते ....
           
उदास निराश मन अंधारी
स्वप्न उजळीता दीप अंतरी
वसंत बहार , कोकीळ वृक्षी
आतुरतेने साद घालिता
कुहू कुहू , गीत येते
             तेव्हा तुझी आठवण येते ....
           
गीत गाता झऱ्या किनारी
सुरासंगे प्रणय धुंद
कळी जेव्हा फूल होते
आणि हळूच कानी माझ्या
प्रेमसंगीत धुंद छेडिते
              तेव्हा तुझी आठवण येते ....
             
प्रणय - पहाटे होता जागृत
स्वप्नरुप जेव्हा डोळ्याआड जाते
जागुनि पहातो गुलाबी गुलाब
वाऱ्यात दंग, भिजवित अंग,
नादात अपुल्या दव - स्नान घेते

               तेव्हा तुझी आठवण येते ....

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita