|| गोरक्ष विभूती ||

Started by विक्रांत, August 22, 2016, 09:53:59 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



जन्मास येताच गुरु बांधी गाठी
गोरक्ष विभूती महाश्रेष्ठ ||
गुरुसेवा तप करुनी निर्मळ
ज्ञानाचे केवळ रूप होय ||
वैराग्ये प्रखर कर्तव्य तत्पर
झाला गुरुवर उतराई ||
गुरूदेवासाठी राम हनुमान
बाजूला सारून ठेवियले ||
मोहाचा सागर विषय आगर
स्त्रीराज्य सुंदर ठोकरले ||
कनकाची माती मातीचे कनक
मच्छिंद्रा कौतुक दाखविले ||
दत्त मानसीचा जाहला चकोर
दृष्टी पदावर अहर्निशी  ||
विक्रांत पोथीत बुडाला प्रेमाने
गोरक्ष तेजाने सुखावला  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/