आकाशा मध्ये असती तारे बहुत

Started by haresh1979, August 23, 2016, 03:42:25 PM

Previous topic - Next topic

haresh1979

आकाशा मध्ये असती तारे बहुत ,

जे ते मोजु शकत नाही ,

झाडांच्या फांद्यावरील फुलणारी  फुल अन पाने,

जे तेही मोजू शकत नाही ,

आभाळामध्ये काळ्या ढगांची गर्दी होते अन  जे धरणीवर बरसती बनुनी थेंबे ,

त्या थेंबांचा हिशोब, कधी कोणीही ठेऊ शकत नाही,

तुमची साथ होती आणि राहीलही ,

ते दिवस कधीही मी विसरू शकत नाही.

माझी कविता -हरेश