आहे एक माझी मैत्रीण

Started by vikrams13, August 23, 2016, 11:26:08 PM

Previous topic - Next topic

vikrams13

आहे एक माझी मैत्रीण


आहे एक माझी मैत्रीण 
नाव तिजे असे निशा
विविध रूपे तिच्या स्वभावाच्या
सांगू कोणत्या आणी कशा

तिच्या डोळ्याचे काय सांगू
नागिनी सारखे डोळे तिचे
शांत असणारी पण ती चिडल्यावर 
काही खर नसते समोरच्याचे

कधी हसते तर कधी रुसते
पण आहे गोड स्वभावाची 
बोलतेही खूप छान म्हणून 
आवडती मैत्रीण आहे सर्वांची

काय जादू आहे काय माहित
तिच्या एका स्माईलमध्ये
समोरच्याचे दुःख घालवण्याची 
ताकद आहे तिच्या एका स्माईलमध्ये

             - विक्रम सरक
Vnsarak