ajab duniya.....

Started by Jyotiramni, August 24, 2016, 05:28:10 PM

Previous topic - Next topic

Jyotiramni

काहीतरी अजब घडतंय माझ्या दुनियेत ,
कोणीतरी न राहवून कानात कुजबुजतय,
थांबलेल्या स्पंदनाचा परत आवाज येतोय ,
खरंच ...
काहीतरी अजब घडतंय माझ्या दुनियेत ..

एक सोनेरी कवच घातलेलं मी स्वतःला,
पण माझाच जीव त्यामध्ये घुसमटतोय,
ओळखीच्या लोकांमध्ये अनोळखीपणा वाटतोय ,
काहीतरी अजबच घडतंय दुनियेत ...

जीवनाच्या रंगमंचावर कित्ती नाटकं 
करावी लागतात ,
चेहऱ्यावरच्या हास्यासाठी शंभर झोल करावे लागतात ,
माझ्या "अपरिचयाच्या" नाटकाला तुझी साथ चांगली भेटली,
म्हणून कदाचित तुझ्याबद्दल असलेली ती "अनामिक" ओढ़
मला परत वाटली ...
         
            -ज्योति kshirsagar (jyotiramni)


>:( ::) :) ;)