TU,ME AANI PAWUS

Started by Jyotiramni, August 25, 2016, 09:20:27 AM

Previous topic - Next topic

Jyotiramni

नातं तुझं माझं

तुझं आणि  माझं  नातं ,आहे पावसासारखा ,
कधी वाट पाहणार,तर कधी अवचित बरसणार ....

तेव्हाही तू होतास आणि आजही तू आहेस
पण प्रत्येकवेळी तुला मी भिन्न स्वरूपात पाहत आहे ,

तुझ्या प्रत्येक भिन्नतेत मला आपलेपणा जाणवतो ,
तुझा अबोलाही मला शब्दांसारखा भासतो....

उभा आहेस तू एका हाकेच्या अंतरावर ,
पण माझी साद तुला पोहचत नाही,
कारण अजूनही तू तुला ओळखत नाहीस,

तुझं आणि माझं नातं असच गोड गुपित आहे ,
गालावरच्या खळी एवढच ते मर्यादित आहे ...

खरंच आहे ....

तुझं आणि माझं नातं पावसासारखा आहे..
थोडसं ओळखीचं आणि बाकी सारं अनोळखी आहे ....   
       -ज्योति(ज्योतिर्मनी)
:)