पेरण्या पर्याय

Started by शिवाजी सांगळे, August 25, 2016, 05:14:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पेरण्या पर्याय

करोन विचार
शेत ते पेरता
शक्य होते घेता
दुजे पिक

कुणी लावा कांदे
कुणी ते टमाटे
उरल्यां बटाटे
लोवोनिया

पर्याय असता
अन्य पिका साठी
दौड का ती मोठी
कांद्या साठी

वैविध्याचा मंत्र
ठेवोनिया ध्यानी
सर्व त्या बळींनी
पिकां साठी

विचार पुर्वक
घेता समजुन
हाटा उमजुन
घ्यावे पिक

हिणवण्या कोणा
नाही ईथे डाव
कल्याण ते व्हाव
कुणब्याचं

ईश्वरा प्रार्थना
करोनी वंदन
दे भरभरून
धान्य पाणी

होईल स्वयंभु
शेतकरी राजा
विश्वास तो माझा
म्हणे शिवा

©शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९