सुटता हाव सुटेना

Started by शिवाजी सांगळे, August 25, 2016, 08:36:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सुटता हाव सुटेना

मी बोलावे तू गप्प व्हावे
गोष्ट माझी कधी त्वा कळेना
अंतरीचे गुपीत माझ्या
कधीच तूजला ते उमजोना

मला वाटे नित्य नवल
गुंतलो गेलो कसे या बंधना
रोज राडे थोडे थोडे
संपवावे कसे मला कळेना

आस तुमच्या या घराची
सोडू म्हणता कशी ती सुटेना
हाव भुकेल्या या जीवाची
भागवावी म्हणता का भागेना

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९