प्रेम कविता

Started by Amol k. Chim, August 26, 2016, 12:15:20 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim

     I miss U
कुठे आहेस सांग तू
आठवणीत मला भुलवनारी
गेलीस दूर तू अन
मला गुर्फटून टाकणारी...

केस मोकळे सोडूनी
हळूच डोकावून पाहणारी
सरळ नाक असूनही
वाकड करत रुसणारी....

कधी सतत बडबड तर
कधी हट्टपणा धरणारी
थोडं समजावंया लागतो की
दिवस पूर्ण घालवणारी....

हात लाऊनी झाडांना
कल्यान्ना तू फुलवणारी
फुलांना धाग्यात बांधून
केसांना सजवणारी....

येऊनी जवळी माझ्या
गालात हँसणारी
धरुनी हात माझा
फिरायला चाल म्हणणारी....

इवलेसे डोळे तुझे
मोठे करून बघणारी
वाट पाहतोय तुझी आज
वाट माझी पाहणारी....

अमोल का. चिम
From -निमकवडा (खामगाव )
मो -8605076572