परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

Started by vikrams13, August 26, 2016, 01:50:54 PM

Previous topic - Next topic

vikrams13

परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

परत फिरुन ये ना
तू माझ्या आयुष्यात
तुझ्याशिवाय कोणीच नाही
आले माझ्या या हृदयात
कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

मागचे सर्व दुःख विसरून
आपण परत नव्याने सुरवात करू
कधी चुकलो तर मला सांगत जा
पण तू मनात राग नको धरू
कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

तुझ्यासोबत तुझ्या आवडत्या
बागेत परत मला बसायचे आहे
आपल्या प्रेमाच्या गप्पात
मला परत तिथे रमायचे आहे
कारण परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे

फक्त तुझ्या आणि तुझ्यासाठी
परत वेडे व्हायचे आहे मला
तुला भेटून तुझ्यावर किती प्रेम
करतो हे सांगायचे आहे मला
कारण  परत तुझ्या प्रेमात पडायचे आहे
   
                        -  विक्रम सरक
Vnsarak