II ऐका वेड्याची कहाणी II

Started by siddheshwar vilas patankar, August 26, 2016, 04:20:52 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



कोतं कोतं कोतं कोतं

त्याचं मन थोडं कोतं

तिच्यासंगे राहण्यासाठी

जागोजागी पळत होत व्हतं II

त्याला काय ठाव अग्नी

त्याला नाय ठाव पाणी

सात जन्मांची ती राणी 

ऐका वेड्याची कहाणी II

शाळा मॉप हुंदडला

येऊन कॉलेजात पडला

सुंदरीला पाहताक्षणी

जागच्याजागीच थांबला II

हाती धरशी पुस्तकं

धरे लेखणी उगाच

मन खोळंबले तेथेच

जागी नाही रे मस्तक II

कुणी मित्र ते दिसेना

कुठे जीव तो रमेना

राघु असाच सुकला

दिसे जागो जागी मैना II

करे पाठलाग तिचा

कोण मामा अन भाचा

सारी माहिती जमवे

जन्मदिन तीचा "मे" चा  II

राणी मॉप ती हुशार

करी भविष्याचा विचार

राजा पाळतीवर सदा

तरी नेहमी निर्विकार II

राजा गाठे तिज एकांती

सांगे सर्व त्याची प्रगती

राणी जाणे त्यास सर्व

टाकी नानाविध अटी II

राजा होता कर्तबगार

फक्त प्रेमाने बेजार

करी जय्यत तयारी

होई नियतीवर स्वार II

दिस-रात  एक केले

सर्व विक्रम  मोडले

एका शब्दाने राजाचे

पुरते नशीब पालटले II

राजा खुश मनोमनी

आता होणार ती राणी

सर्व आलबेल आता

सुरु होणार कहाणी II

राणी धूर्त लयी भारी

धुंडी पाताळ ती सारी

डाव टाकला टाकला

राजा विकला विकला

राजा चाले तिच्यासंगे

राजा डोले तिच्यासंगे

मानसन्मान विकूनि

घरजावई त्यो झाला II



सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C