समाज

Started by शिवाजी सांगळे, August 26, 2016, 04:28:25 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

समाज

केंव्हांच पुरले गेले
समाज पुरूष
तुमच्या आमच्यातले
जागवित होते जे
निंद्रीस्त समाजाला

आहेत काही मोजके
आजही जे...
उठवू शकत नाहीत
निंद्रेच सोंग घेतलेल्या
ढोंगी समाजाला

ज्यांना कसली चाड
सुकलेल्या रक्ताची
वा ओघळत्या
कोवळ्या आसवांची

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९