Veda Mann

Started by Tirtha Bakshi, August 27, 2016, 12:16:06 AM

Previous topic - Next topic

Tirtha Bakshi

   ~वेडं मन~
खरंच, मन किती वेडं असतं ना,
पण नेमकं कसं?🤔
मन असतं ऋतुं सारखं!
सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं,🌞
हळु हळु खुळणारं, थोडसं लाजणारं,
हळुवारपणे दुसर्याच्या मनाला स्पर्श करणारं! अगदी एका फुलासारखं!🌼
खरंच मन किती वेडं असतं!
मन असतं बिनधास्त पावसासारखं,🌨
पावसात ओलं चिंब होऊन जसं मोकळं वाटतं अगदी तसं...
कधी कधी विचारांमुळे वीजेसारखं चमकणारं,🌩
काहीवेळा स्वतःच्या मनाशी भांडताना ,
मन होतं पावसाच्या ढगांसारखं गडगडणारं.....🌧
मन असतं थंड शीतल वातावरणात शांत करणारं,🌃
प्रेमाची, आपलेपणाची भावना व्यक्त करून,
मन लहानमुलासारखं एक कुशी शोधायला लागतं!🤗
खरंच, मन किती वेडं असतं!
मन असतं सुर्योदयासारखं!🌄
रोज नवीन आशा, नवीन उमेद घेऊन येणारं!🌠
मन असतं सुर्यास्तासारखं, क्षितीजा मधे जाणारं, सगळे वाईट विचार हळु हळु नाहीसे करणारं....🌅
खरंच! मन किती वेडं असतं ना!
                                            तिर्था बक्षी