Tujhyat Majhyat

Started by Tirtha Bakshi, August 27, 2016, 12:33:13 AM

Previous topic - Next topic

Tirtha Bakshi

अजाणतेपणे मी तुझ्यात रमुन गेले,
का, माहीत नाही
एक वेगळाच जादु आहे तुझ्यात...
तुला बघताच होते मी बावरी,
लाजते मी मनातल्यामनात...
कधी, कशी मी माझ्यात
शोधायला लागले तुला,
एक अनामिक ओढ आहे तुझ्यात...
एक हिरमुसलेली कळी जणू
होती एका फूलाच्या शोधात...
खुलली ती अलगदपणे
पाहुनी तुला या सुंदर जगात...
वेळ पण कमाल आहे!
जेव्हा भेटले मी तुला,
भान हरपले तुझ्यात नादात...
नक्कीच काहीतरी खास आहे,
तुझ्यात-माझ्यात!
                                          तिर्था बक्षी