जळणं आणि वाहणं

Started by Parshuram Sondge, August 28, 2016, 05:35:33 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

 तो आला
हासत हासत आणि अधाशपणे
घेतलं ओढून कुशीत मला
पण
मी तटस्थ पणे जळत राहीले
त्या उसळलेल्या वासना आगीत
मी शोधत राहीले
ह्रदयातून पाझराने ते प्रेमाचे
थेंब
शपथ !
मी अनुभवला फक्त  जाळ
तुझ्या
कुशीत मी शिरले की तुझं ह्रदय
असं थेंबा थेंबानं पाझरत राहयंच
आणि
त्याची नदी होत जाई
मी वाहत जाई
अगदी भौतिक वस्तू सारखी
जळणं असेल
नाही तर  वाहणं असेल
लोक  त्यालाच
प्रेम म्हणतात
. . . . परशुराम सोंडगे. पाटोदा
. . . . 9673400928
Pprshu1312