तू सहज म्हणालास रे

Started by vikrams13, August 28, 2016, 06:17:46 PM

Previous topic - Next topic

vikrams13

तू सहज म्हणालास रे

तू सहज म्हणालास रे
मी कठोर झाली आहे
पण तुला माहित नसताना मी
हि खूप तुझ्यासाठी रडली आहे

तू सहज म्हणालास रे आयुष्याच्या
वाटेवर एकट्याला गेली सोडून
पण माझे किती प्रेम होते तुझ्यावर
सर्वाना माहिती होते फक्त तुला सोडुन

तू सहज म्हणालास रे
मी फसवले आहे तुला
पण मी किती तुझ्यासाठी
झुरत होते हे माहित नसेल मला

तू हि माझ्या जाण्याने
माझ्यसाठी रडत असशील
पण तुझ्यासाठी मला  कधी
तू रडताना पहिले नसशील

                   - विक्रम सरक 
Vnsarak