श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

Started by गणेश म. तायडे, August 29, 2016, 10:32:54 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जाता पंढरीशी सुख वाटे जिवा
गेले संत सेना सांगोनिया
नाभिकाचा जन्म हरीचा छंद
चित्त भान सारे सोडोनिया

शुद्ध होई मन तुझ्या रे अभंगा
काढोनिया गाळ मनाचा मलीन
दिस रात जप करी विठोबाचे
भक्तीत लीन मन होई तल्लीन

मुसलमान राजा झाला धन्य फार
तुझ्यासाठी देव दरबारी सेवा करी
रूप तुझे घेवुनी धावे कर्तव्यास
भक्त संकटात पाहता ना येई

धन्य संत सेना, धन्य तुझी भक्ती
शीर नाभिकांचे तु उंचाविले
झुकोनिया शीर तुझ्या चरणांवरती
धन्य झालो घेऊन जन्म नाभिकाचे

- गणेश म. तायडे, खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com