प्रेम कविता

Started by Amol k. Chim, August 29, 2016, 09:42:16 PM

Previous topic - Next topic

Amol k. Chim

कश्यावर प्रेम करतेस ग नेमकं....
माझ्या बोलण्यावर कीं हसन्यावर.

काय भावलय तुला माझ्यातल,
माझ वक्रुत्व कीं प्रेम बेसुमार

आहे का जागा या शिवाय तुझ्या मनात माझ्यासाठी,
आहे का थोडी माया माझ्यातला भावडेपनासाठी.
की
नुसतंच बोलाव म्हणुन बोलतेस
अन हसावं म्हणून हसतेस.

प्रेम आहे कश्यावर तुझ
माझ्या करड्या आवाजवर,
प्रीत आहे कश्यावर तुझी
माझ्या पडणाऱ्या प्रभवावर.

मग
मी म्हणून ज्याची ओळख आहे त्याने
भावना आवराव्या कुठंवर.

माझे  गुण तर माझ्यावर चिकटलेट
मग
आहे  का  प्रेम तुझ माझ्यावर .

सांग न  ग......
कश्यावर प्रेम करतेस नेमकं....

माझ्या काव्यांवर की माझ्या शैलीवर
काय भावलय तुला माझ्यातल....
सांग न ग प्रिये
कश्यावर प्रेम करतेस नेमकं.....

By -अमोल का चिम
(खामगाँव )
8605076572