अजून किती दिवस

Started by Ravi kamble, August 29, 2016, 10:01:04 PM

Previous topic - Next topic

Ravi kamble

*अजून किती दिवस..*

सांग मित्रा अजून किती दिवस
कॉन्ट्रीब्युशन काढून
फ्लेक्सबाजी करणार आहेस
अजून किती दिवस त्या दहा बाय दहाच्या
बॅनरमध्येच तुझं आयुष्य घालवणार आहेस
अन् फुकटची हमाली सोडून
तुझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या
त्या बापाचं घाम कधी पुसणार आहेस
सांग मित्रा अजून किती दिवस...

सांग मित्रा अजून किती दिवस
बिनलाज्यासारखं
कुणाच्याही वाढदिवसाला
बळच न सांगता
म्होरक्याच्या माग माग जाणार आहेस
कुणाच्याहि वरातीत
फुकटची मिळती म्हणून
अजून किती दिवस नाचनार आहेस
अन् फुकटची हमाली सोडून
तुझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या
त्या बापाचं घाम कधी पुसणार आहेस
सांग मित्रा अजून किती दिवस...

सांग मित्रा अजून किती दिवस
झेंडे बदलत फिरणार आहेस
रंगाच्या या रंगील्या राजकारणात
अजून किती दिवस अडकून पडणार आहेस
अरे टिशू पेपर केला जातोय तुझा
तू कधी समजून घेणार आहेस
अन् फुकटची हमाली सोडून
तुझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या
त्या बापाचं घाम कधी पुसणार आहेस
सांग मित्रा अजून किती दिवस...

सांग मित्रा अजून किती दिवस
हे असंच चालू ठेवणार आहेस
बघ जरा त्या माऊलीकडं
कष्टानं पार खचून गेली
बघ जरा त्या ताईकडं लग्नाचं वय निघून गेलं
अरे वेळ नाही गेली अजून मित्रा
कधी स्वाभिमान तुझा जागवणार आहेस
अन् फुकटची हमाली सोडून
तुझ्यासाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या
त्या बापाचं घाम कधी पुसणार आहेस
सांग मित्रा अजून किती दिवस.

*रवींद्र कांबळे पुणे 9112143460*
*व्हाट्सप क्रमांक. 9970291212*