अशी सुंदरी कुठं हुडकावी

Started by randivemayur, August 30, 2016, 11:12:51 PM

Previous topic - Next topic

randivemayur

अशी सुंदरी कुठं हुडकावी
जिच्या शोधण्यानं जग हरवावं ..!


मन उडत उडत जावं ,
काळीज गुपचूप लाजावं,
उगड्या डोळ्यानं स्वप्न बगावं,
श्वासान पहिल्या प्रेमात पडावं,
शरीर मेल्यागत व्हावं,
फक्त्त हसत हसत राहावं
दुनियात सारं सुंदर दिसावं .

अशी सुंदरी कुठं हुडकावी
जिच्या शोधण्यानं जग हरवावं ...!


#डोंगरी
मयूर रणदिवे (9422705007)