वेदनेची मधुरिमा...!!!

Started by Rajesh khakre, August 31, 2016, 07:35:07 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

वेदनेची मधुरिमा जी अडकते श्वासांमधूनी
वेदना मग पुन्हा उमलते पिसारा फुलवुनी

अश्रृंची मक्तेदारी काढते मोडून ती
वेदनेच्या उरी झरते स्मितहास्याची सरी

काय त्यांना ज्ञात, उरातला आकांत हा
ज्यांच्या जीवनी सदैव त्या आनंदाच्या फैरी

मीच माझ्या डोळ्यांनी बघतो माझाच अंत हा
तरीही का न पळतो भयापासून त्या दुरी

शरीर हे इथलीच अनामत राहील इथेच ते
'आत्मा' अविनाशी हसतो खट्याळ माझ्या अंतरी
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com