भेट

Started by AMOL GAWDE, August 31, 2016, 09:13:24 PM

Previous topic - Next topic

AMOL GAWDE

नजर  भिडली  एका  वाटेवरती
तरी बोलत  ती  पण  नाही
आणि  मी  पण  नाही ..
नजर  चुकवणे  तिलाही  जमले  नाही
आणि मलाही जमले  नाही ..
हा  बोलेल आणि ही बोलेल
ह्या आशेवरती  मात्र  मन  झुलत  होते ..
तरी  रागावली   ती  पण नाही
आणि  रागावलो  मी  पण  नाही ..
पण  उगाच  आशेवरती  ठेवणं
तिला मात्र  जमलं नाही ..
मग
अचानक  एका  वाटेवरती भेट   होते पुन्हा
पण  बघत ती सुद्धा  नाही
आणि  थांबत  मी पण नाही ..
जेव्हा  पण  बघायचो  तिला
मनी ठरवायचो  बोलेन  तिच्याशी
पण  ऐकत  ती पण नाही
आणि  सांगत मी पण नाही ..
एका  गोष्टीची  खात्री  पटली
प्रेम  आपले  खरे  होते
आणि  हे  ती  पण  नाकारत  नाही
पण  सांगत  मात्र  मी पण  नाही ...

                                - अमूल्य