सखे कसा झाला हा उन्हाळा....!

Started by Deepak Chavan, August 31, 2016, 11:28:17 PM

Previous topic - Next topic

Deepak Chavan


ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात एक सखी आपल्या सख्याला भेटायला का नाही आला याचं उत्तर विचारते ...यावर सखा आपल्या दुःखाची कहाणी या कवितेद्वारे कळवतो अशी कल्पना करून हि कविता लिहिली आहे.


सूर्य माथ्यावर आला, अन लागती उन्हाच्या गं झळा
कुशी धरणीची आटली ! सखे आला हा उन्हाळा (2)

पाण्याचा नाही थेंब,नाही फळभाज्यांचा गं मळा
मज लागती पाण्याचा लळा ! सखे आला हा उन्हाळा (2)

शिवार काळ बेर झालं,वर दिसती उन्हाच्या गं झळा
कर्म न करूनही घाम आला ! सखे आला हा उन्हाळा (2)

रांजण,हंडा कळशीचा संसार,सखे कोरडा पाषाण गं झाला
मज लागे पाण्याचा जिव्हाळा ! सखे आला हा उन्हाळा (2)

शेतामंदी राबून माझ्या मायेचा जीव गं घरी आला
पाण्यावाचून जीव कासावीस झाला ! सखे आला हा उन्हाळा (2)

गावात नाही पाण्याचा थेंब , मदतीला टँकरवाला आला
सारा गाव कधी नव्हत गोळा झाला ! सखे आला हा उन्हाळा (2)

पाणी आणाया मायेचा जीव, भन भन इरीवर गेला
जीव परत नाही आला ! कसा झाला हा उन्हाळा (2)

काय सांगू सखे,तुझ्यासारखा होता मला माझ्या मायेचा लळा
कसा विरह हा झाला ! कसा झाला हा उन्हाळा (2)

लेखक :- दिपक चव्हाण
मु.पो.मुंदेफळ,ता.मेहकर , जि. बुलढाणा
संपर्क क्र :- 8108914410
ईमेल :- chavan.deepak297@gmail.com