अन प्रेम माझे अमर झाले...!

Started by Deepak Chavan, August 31, 2016, 11:42:47 PM

Previous topic - Next topic

Deepak Chavan

अन प्रेम माझे अमर झाले...!

प्रेम सारे करायचे, प्रेमासाठी तुझवर सारे झुरायचे

सारं कलुनही तुला, प्रेम तुझे माझासाठी उरायचे

तुझ्या प्रेमाचं रुप, कधीतरी होतं माझ्या नशिबात

प्रेम मजं करावसं वाटायचं, पण आडवी येई ती जात...!

घसरला पाय अनं चालु लागलो प्रेमाची आडवलण वाट

अंधारल्या वाटेत तुला शोधता शोधता झाली एक पहाट

पहाटेचा कोवला रस्ता चालताना वाटेत धोंडे खुप आले

अडविली वाट,केला घातपात अनं प्रेम माझे अमर झाले...!


दिपक चव्हाण,
मु.पो.मुंदेफल, ता.मेहकर, जि.बुलढाणा
[/b]