फक्त मला एकदा तरी उडू द्या

Started by chinchalkarpallavi, September 01, 2016, 04:20:07 PM

Previous topic - Next topic

chinchalkarpallavi

फक्त मला एकदा तरी उडू द्या
या जगाचा प्रत्येक काना कोपरा मला एकदा तरी पाहू द्या

लहानपणा पासून उडायला शिकवले
आसमानात फिरायला शिकवले

पावलोपावली प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी बरेच अनुभव सांगत आलात
मला शिकवत आलात

मला या जगाने काय दिले आणि मला या जगाला काय द्यायचे आहे
त्याची आठवण करत आलात

एवढ सगळ असून सुद्धा तुम्ही मला तुमच्या पंखा खाली का ठेवत आलात
प्रत्येक संकटात मदत करत आलात

पंखात आहे बळ
फक्त एकदाच उंच भरारी घ्यायची इच्छा आहे

आता तरी उडू द्या
या जगाला मोठ होऊन दाखवायचं आहे

फक्त मला एकदा तरी उडू द्या
या जगाचा प्रत्येक काना कोपरा मला पाहू द्या

पल्लवी नारायण चिंचळकर
०१/०८/२०१६