यातनांच अस्तित्व ........

Started by विजय वाठोरे सरसमकर, September 01, 2016, 06:12:29 PM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


यातनांच अस्तित्व ........

सये
आजही तुझ्याच विरह यातनेत
स्वताला सावरतो ग मी
तुझ्या त्या धाडशी प्रवृतीस
आजही गुणगुणतो ग मी

तुझ्या या यातनाच
खूप प्रिय वाटतात ग आता
सायेच्या प्रीतीवर सर्वच जीव लावतात ग
पण या यातनांना असते वेगळ्या अस्तित्वाची गाथा


तू,तुझा तो लडिवाळपणा
तुझ्या प्रत्येक आठवणी आज खूप छळतात ग मला
या जगावेगळ्या नात्यात प्रीतीच्या
प्रेमापेक्षा जास्त यातनाच मिळाल्या ग मला

तरीही मला याचे दु:ख किंवा
थोडीही खंत नाही तू सोबत नसल्याची
कारण आता सवयच झाली ग मला
तुझ्या या अप्रतिम अशा यातनेसोबत जगण्याची

तूच नाही जाणत ग हाल जीवाचे
बाकी हे जग मला 'वेडा' च आहे म्हणतात न्यारा
पण या जगास काय माहित ग
वेड लावलेल्या त्या वेडीस मिळवण्याचा हा खटाटोप सारा !

    विजय वाठोरे सरसमकर
      साहिल
    हिमायतनगर जि.नांदेड
          ९९७५५९३३५९