कविता II नऊची ती बस खास होती II

Started by siddheshwar vilas patankar, September 02, 2016, 04:16:27 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

नऊची ती बस खास होती

आतुर व्हायचो उठताक्षणी

कधी एकदा गाठतो 

ती नटून थटून आलेली महाराणी

लगबग चालू असे नेहमी

आईची ती सारखी बडबड

आताच लागला कामाला

तर एवढी तुझी फडफड

जणू गावात लग्न

अन कुत्र्याची हडबड II 

तुका झाला होता

तिच्यासाठी जीव माझा

ज्ञानेश्वर सोपान अंतरी ते

कपाळी सदैव तिच्या नावाचा टिळा होता  II

लाली पावडर लावून

रोज धावायचो

बघायचे राहून गेलेच

तर रिक्षातल्या आरशात

थोबाड बघायचो

दोन रुमाल नेहमी खिशात

सदैव दिमतीला असायचे

ती येण्यापूर्वी एक थोबाड पुसण्यास

अन नाही आली तर

दुसऱ्यानं डोळे पुसायचे  II

दिवस असेच ढकलत होतो

तिकिटावर तिकीट काढत होतो

प्रवासी वाढत होते बसला

तिच्या आजूबाजूला बसण्यासाठी

झुरत होतो  II

सोबतच्या एका प्रवाशाने

माझेच तिकीट कापले

बघता बघता एके दिवशी

त्यांच्या लग्नाचे पेढे वाटले

जळून स्वप्नाची राख झाली

नऊची बस आता बस्स झाली  II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

धन्यवाद मित्रा . सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C