" मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित " आमटे कुटु

Started by VIRENDRA, January 02, 2010, 12:30:35 PM

Previous topic - Next topic

VIRENDRA

" मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित " आमटे कुटुंबियांच्या विषयी थोडेसे...

बाबा आमटे त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश व स्नुषा डॉ. मंद आमटे म्हणजे पृथ्वीवरील देवच जणू...
हे सर्वजण महाराष्ट्रातल्या मातीत वाढले, रुजले आणि महाराष्ट्रातल्या दुर्गम अशा  आदिवासी भागातील  लोकांसाठी, त्यांच्या सुख, समाधान,  आरोग्य  अशा प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांचा साठी आपले जीवित वाहून घेतले हा महाराष्ट्र चे भाग्य...

बाबांच्या विषयी मी खूप वर्षपूर्वी पाहिलांदा वाचले होते,

बाबा लिहितात....
" मी लहान होतो, आज दिवाळी होती, मी वडिलांची वाट बघत बसलो होतो, वडील घरात आले त्यांनी मला खाऊ साठी काही पैसे दिले.मी ते घेऊन बाहेर पडलो.आमच्या घर पासून काही अंतरावर एक देऊळ होते, मी देवदर्शनाला आत जात होतो इतक्यात पायरी वर  बसलेला एक इसम मला दिसला, त्याच्या सर्वांगावर जखमा होत्या, हातापायाची बोटे झाडून गेली होती... तो कुष्टरोगी होता, देवळातून येणारे लोक त्याचाकाडे तुचातेने बगून  तोंडे फिरवून  जात  होते. " माणसासारखा माणूस एका असाध्य रोगाने पिडलेला पाहून आणि लोकांचा त्या नजरा  पाहून मला कसेतरीच झाले.. " मझ्या खिशातले पैसे मी त्याच्या झोळीत टाकले आणि मी माघारी फिरलो देवळात ना जाता, त्यानंतर मी आयुष्यात कधीच देवळाची  पायरी चढलो नाही....

हीच आनंदवनाची सुरवात होती..

बाबा पुढे म्हणतात,
"जेव्हा मी आनंदवनाची सुरवात केली तेव्हा माझ्याकडे एक कुष्टरोगी,एक लंगडी गाई आणि ७ रु. भांडवल होते.."


आज आनंदवनाचा वटवृक्ष  झालेला आहे... सर्व सेवा सुविधा जसे कि शाळा,महाविद्यालय, बॅंका तिथे आहेत, तिथे अशा हजारो कुष्ठ रोग्यावर उपचार केले जातात त्यांना लघु उद्योगांचे शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले जाते...

हजारो कुष्ठ रोग्यावर  बाबांनी मायेची आणि प्रेमाची सावली धरली, त्यांच्या आयुष्यात आनंद यावा यासाठी  आपले आयुष्य वेचले...

आज बाबा आमटे आपल्यात नाहीत पण त्यांचे हे महान कार्य त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवले आहे..

नवीन वार्ष्याच्या  सुरवातीलाच हजारो कुष्ठ रोग्याचे मायबाप असलेल्या बाबांच्या चिरंतन स्मृतीला अभिवादन...

वीरेंद्र पाटील.
सांगली.
(९२७१८२३७०८).

santoshi.world



pomadon

अप्रतिम .....समाजाला नवा दृष्टीकोणं देणारे बाबांच्या चिरंतन स्मृतीला अभिवादन...  धन्यवाद