खरच खूप वेगळी होती ती

Started by Ketan Kurhade, September 03, 2016, 11:15:33 PM

Previous topic - Next topic

Ketan Kurhade

खरच खुप वेगळी होती ती
पहिल मला बदलवल आणि आता स्वतः बदलून गेली,
कधी मला एकट नाही सोडणार अस म्हणनारी इतक्या लवकर मला सोडुन गेली,
आज मी ही तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय,
पण तिला विसरायच कस हा विचार मी दिवस राञ करतोय,
तिच्या साठी मरण्या पेक्षा तिच्या आठवणीत जगायला आवडेल मला,
पण कधी मना पासुन आठवण आली तिची तर चोरुन बघितलेल चालेल का तिला,
खुप खुश आहे ती माझ्या पासुन दुर राहुन,
आणि आज मी ही खुश आहे तिला आनंदात पाहुन,
आज माझी हिम्मत ही नाही तिच्या  डोळ्यात बघण्याची,
कारण भिती वाटते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडण्याची,
नाही सहन होत आता तिने दिलेला ञास, वेळोवेळी होणारा तिचा भास,
ती कधीचं वाईट नव्हती वाईट तर फक्त मीच होतो,
हसत खेळत राहणारी ती तिला ञास मीच देत होतो,
ती तिला ञास मीच देत होतो,

केतन कुर्हाडे
ता.हवेली
जि.पुणे
मो.९९६००९६११६