प्रेमाचे शेवटचे गाणे

Started by RAM NAKHATE, September 04, 2016, 11:18:47 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

प्रेमाचे शेवटचे गाणे
•••••••••••••••••••••••••••••
धुंद सुटलाय हा वारा |
कंठ दाटुनी आल्या धारा ||
आठवन तुझी येता मला |
नाही मिळत सुर ध्वनीला ||

सुर झाले,असता गोड |
होईल मला तुझी अवड ||
आवडत नाहीस तु मला |
का असे सुख माझे, दुःख तुला ||

नाही बोलनार आता तुला |
शब्द माझे नाही कळतं तुला ||
प्रेमासाठी शेवटचे गाणे |
खुपच झाले अवघड गाणे ||

मुखातुनी फुटती शब्द सारे |
नेती ओडुनी पुडेच सारे ||
गळयातुनी गातोय गाणे |
आपुल्या या नात्याची गाणे ||

धुंद वार्याचा तोल बदला |
येती शब्द अधो  कर्नाला ||
शब्दांचा ह्या अनर्थ झाला |
तुझ्या नाही मी सोबतीला ||

मित्र ना प्रेम तुझा झालो |
मी माझा एकटा झालो  ||
नाहीत कुटले संकट मला |
ना कोनाचा त्रास मनाला ||
                    - नखाते राम
           मो.नं. ९५४५०१३६७९
          मु.मांडणी, ता.अहमदपुर,
                    जि. लातुर