शोध प्रेमाचा...

Started by गणेश म. तायडे, September 04, 2016, 01:02:03 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

गंध तुझा मोहक
रंग रंगात मिसळला
रूपाची खाण तु
जीव तुझ्यात हरवला
पाहू नको तु अशी
नको करू नजरेचा वार
नको तुझे हसणे गुलाबी
मनाचे हाल होतील फार
गळ्यात चांदण्यांच्या माळा
हातात शोभे हिरवा चुडा
छणछण करती पैंजणे
अशी तुझी नखरेल अदा
बोलावे मी काय अजुन
डोळ्यात तु माझ्या पहा
प्रेम केले मी तुझ्यावर
एकदा स्वतः शोधून पहा
दिसणार मी तुला नक्की
कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात
अनुभवणार तु मला तेव्हा
अंगी उठत्या शहाऱ्यात
वाढतील हृदयाची स्पंदणे
चुकतील हृदयाची ठोके
ऐकू येतील फक्त शब्द माझे
भासेल तुला तेव्हा सारे जग मुके

- गणेश म. तायडे, खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com