मन माझे.

Started by गोपाल कल्याणकर, September 04, 2016, 06:42:05 PM

Previous topic - Next topic
चिंब भिजले मन बावरे बघुन तुझे सौंदर्य लाजरे।
नयन करती घायाळ अल्लड वरुन रेशमी केस भिरभिरे।ओठ तुझे गुलाबपाकळ्या लाली त्यावर फिकी पड़े।
मन माझे जड़ले तुझ्यावर..
नभात तू , चंद्रात तू , तूच तू चोहिकडे...!!
           
अवखळ पैंजन नाद करती चाहूल तूझी कानी पड़े।
मृगनयन हे भाळती तुझ्यावर मनांस माझ्या विसर पड़े।
घे सावरुन् मनांस माझ्या हातात तुझा हात दे।
मन माझे जड़ले तुझ्यावर..
स्वप्नात तू , जगण्यात तू, तूच तू चोहिकडे...!!
           
घे जाणून साद मनाची तुझ्याचसाठी जिव धड़पड़े।
तू नसतांना झुरतें बावरें दिसता तू हलके चैन पड़े।
तू दिसल्यावर "हृदयसाद" मी देतो तुझ्या हृदयाकडे।
मन माझे जड़ले तुझ्यावर..
ध्यासात तू , भासात तू , तूच तू चोहिकडे...!!
           
           
✍✍✍ @ गोपाल कल्याणकर