==* प्रीत माझी ही अधूरी *== (गजल)

Started by SHASHIKANT SHANDILE, September 05, 2016, 09:11:32 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

प्रीत माझी ही अधुरी राहली कशी !
घात केला का कुणी ती राहली अशी!!

घाव पाठी ओठ मीठे प्रीत कापली!
काय झाला फायदा ती राहली अशी !!

श्वास माझा थांबला का या हृदयी !
काळजाला भिडली ती राहली अशी !!

मानला मी प्राण ज्याला या जीवनी !
सोडला का श्वास आणि राहली अशी !!

आसवांनी सांझ होता रडतो 'शशि' !
आठवाया का अधूरी राहली अशी !!
---------------------//**--
शशिकांत शांडिले (एकांत), नागपुर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!