जिवनाच्या वाटेवर एकटाच चाललो होतो...

Started by Ketan Kurhade, September 05, 2016, 11:02:45 AM

Previous topic - Next topic

Ketan Kurhade

जिवनाच्या वाटेवर एकटाच चाललो होतो,
कोणालातरी सोबत शोधत होतो,

चालुन चालुन थकलो पण नाही आले सोबत कोणी,
शेवटी विचार केला की आपल्या नशिबातच नाही कोणी,

मनाने एकटा राहण्याची तयारी केली,
तेव्हड्यात तु तिथुन हसत गेली,
मला जशी पाहिजे होती मी तुझ्यात पाहिली,

तुला बघताच क्षणी तुझ्या त्या शांत निरागस डोळ्यात मी बुडत गेलो,
का कोणास ठाऊक नकळत मी तुझ्या प्रेमात पडत गेलो,

मला आठवतय तुझ्या प्रेमात पडताना उन्हाळ्याचा दिवस होता,
तो सुर्य  देखिल मला तुझ्या प्रेमात पडताना आडवत होता,

माझ्या प्रेमा समोर तो सुर्य देखिल बाजूला झाला,
तोच ढगांचा गडगडाट होवून पावसाळ्याचा दिवस आला,

त्या पावसात आपल्या पहिल्या पहिल्या भेटीचा क्षण होता,
मनातलं सर्व काही तिला सांगण्याचा तो क्षण होता,

मनातल काहीच मी तुला सांगु शकलो नाही,
कारण माझ काही ऐकायला तुझ्या कडे कधी वेळच नाही,

त्या पावसाच्या पाण्यासोबत माझे अश्रू देखिल वाहत होते,
इतके अश्रू वाहुन सुद्धा हे मन प्रत्येक वेळेस तुलाच का आठवत होते,

जाता जाता तो पाऊस मला बरेच काही  शिकवून गेला,
तुझ्या बद्दल सांगताना जाताना तोही थोडा रडवून गेला,

हळूहळू हिवाळ्याची ही सुरवात झाली,
त्या प्रत्येक राञी सोबत माझी स्वप्नही मोठी झाली,

त्या प्रत्येक स्वप्नात मला फक्त तुझीच आठवण आली,
डोळे उघडताच क्षणी तुही नजरे आड झाली,

फक्त तुझ्या साठीच मी त्या देवासमोर ही हात जोडले,
इतके प्रेम करुण सुद्धा तु पुन्हा मला त्या एकटय़ा वाटेवर नेऊन सोडले,

असे किती उन्हाळे पावसाळे येवून जातील,
असे कित्येक वर्ष ही निघुन जातील,

एकच सांगन आहे ग तुला,
ह्या जन्मी तरी विसरणं शक्य नाही ग तुला,

प्रत्येक वेळेस एकच प्रश्न असेन माझा तुला,
खरचं तुझ्या आयुष्यात काहीच किंमत नाही का ग मला...


केतन कुर्हाडे
मो.९९६००९६११६