गल्लत झाली ओळखायला

Started by vikrams13, September 05, 2016, 11:27:32 AM

Previous topic - Next topic

vikrams13

गल्लत झाली ओळखायला

व्हाट्सअप वर Online ती ही
असते आणि मी हि असतो
आधी खूप एकमेकांशी बोलणारे
आता मात्र दुर्लक्ष करतो

खूप चांगली मैत्रीण होती माझी
पण तिच्या मैत्रीला मी प्रेम समजले
ती सोडून गेली मला जेव्हा माझ्या
मनातले प्रेम तिला उमजले

गल्लत झाली ओळखायला,
कारण तिचा तो गोड स्वभाव
तिला माझ्या प्रेमापेक्षा मैत्री
प्रिय होती ,कारण माझा स्वभाव

आता ती दूर काय जवळ काय
ना राहिली ती मैत्री ना मिळाले प्रेम
विचारून चुकी केली असेही वाटते पण
विचारले नसते तर हरवले असते दोघांचे प्रेम
                     - विक्रम सरक

Vnsarak