==* सांग देवा तू *== (गजल)

Started by SHASHIKANT SHANDILE, September 06, 2016, 11:20:52 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

भार का हा सोसवेना सांग देवा तू !
घात झाला का मनाचा सांग देवा तू !!

मीच आता खेळ झाले जीवनाची या !
हा रवी का तापला रे सांग देवा तू !!

झोपला का बाळ देवा हा उपाशी रे !
मारला का बाप याचा सांग देवा तू !!

साथ नाही हात नाही माय बाकी मी !
का नशिबी ही गरीबी सांग देवा तू !!

बोलतो का हा शशि रे देव नाही तू !
तो खरा की मी ख़री हे सांग देवा तू !!
---------------------//*--
शशिकांत शांडिले (एकांत), नागपुर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

kale siddhesh



SHASHIKANT SHANDILE

मनस्वी आभार अनिकेतजी ! :)
Its Just My Word's

शब्द माझे!

SHASHIKANT SHANDILE

धन्यवाद सिद्धेशजी!
Its Just My Word's

शब्द माझे!