कोण होती ती...

Started by Ketan Kurhade, September 06, 2016, 07:37:44 PM

Previous topic - Next topic

Ketan Kurhade

कोण होती ती तिच्यावर मी इतक प्रेम केल,
पण कळल नाही मला हे सर्व मी का केल,
काय भेटणार होत मला हे सर्व करुण,
दिवस राञ कोणासाठी झुरुण,

तिच्या कडून कधी  काही मिळण्याची मी अपेक्षा ही मी केली नव्हती,
फक्त तिला मिळवण्या साठी देवाकडे प्रार्थना मी केली होती,

त्या देवालाही माझ तिच्यावर प्रेम करण आवडल नाही,
म्हणून त्या देवाने तिला माझ कधी होऊच दिल नाही,

असेल माझा दोष पण माझ्या प्रेमाचा काय दोष होता,
फक्त प्रेम केल या वेड्याने नाही तर तो ही निर्दोष होता,

प्रेम करण ही जर चुक असेल माझी तर ही चुक मी पुन्हा पुन्हा  करेल,
जर आनंद होत असेल तिला मला हरताना पाहून तर मी तिच्या साठी प्रत्येक वेळेस हरेल,

तिच्या वर प्रेम करताना हे आयुष्यही खुप छोट वाटतयं,
कारण सुखापेक्षा दुखःच खुप मोठ वाटतयं,

अजून किती छळणार आहे ती मला,
अजून किती रडवणार आहे ती मला,

थकलो सांगुन मी तिला की माझे तुझ्या वर खुप प्रेम आहे,
माझ्या साठी माझ सार आयुष्यही फक्त तुच आहे...

थकलो सांगुन मी तिला की माझ सार आयुष्यही फक्त तुच आहे......

केतन कुर्हाडे
मो.९९६००९६११६