कितीतरी दिवसात

Started by AMOL GAWDE, September 07, 2016, 08:45:32 PM

Previous topic - Next topic

AMOL GAWDE

For All The Traveller's & Friends...

कितीतरी दिवसात
नाही भटकंतीला गेलो ;
कितीतरी दिवसात
नाही एकत्र रमलो ॥

गोड वाऱ्याची मंद झुलुक
अजून आहे मनी तशीच ;
आणि सुंदर सह्याद्रीची
परत वाट चालावी तीच ॥

केव्हातरी गगनात
पुन्हा होऊया निर्भय ;
डोंगराच्या कुशीत
हरवूया क्षणभर ॥

नसेल कशाचीही भीती
असेल साथ चांदण्यांची थोडी ;
सोबतीस नदीचा प्रवाह
अंगावरचा काटा मोडी ॥

बरे आहोत जीवनी इथे
दिस कापती अंतरी ;
पुन्हा वेड्या मनाची
करूया नवी भटकंती ॥

                 -अमूल्य