विझणारा दिवा

Started by विक्रांत, September 08, 2016, 12:26:08 AM

Previous topic - Next topic

विक्रांत




विझणाऱ्या दिव्यामध्ये थोडे तेल घाल
काजळल्या वातीची नि कर देखभाल

सांभाळले तूच तर बघ सांभाळेल
नाहीतर वाऱ्यावर सहज विरेल

तुझी हात वात्सल्याचे समर्थ सशक्त
अंधाराशी झुंजतांना हवी फक्त साथ

तुज सारे ठाव तरी पावूल माघारी
विझू विझू जाय मग प्राणांची उभारी

मातीच्या दिव्यास नसे स्वत:ची कहाणी
पेटवतो ज्योत त्यास सारी जिंदगानी

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मिलिंद कुंभारे

मातीच्या दिव्यास नसे स्वत:ची कहाणी
पेटवतो ज्योत त्यास सारी जिंदगानी ....

अप्रतिम ..... :) :) :)

विक्रांत

मिलिंद खूप दिवसांनी ,केदार ने येणे सोडल्यापासून प्रतिक्रिया  :) :)