तिचे त्याचे प्रेम म्हणजे

Started by विक्रांत, September 08, 2016, 12:54:19 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

तिचे त्याचे प्रेम....

तिचे त्याचे प्रेम म्हणजे
उधान वारे वाहणे असते
नदी ओढा कालवा ओहळ
पाण्यास नाव देणे असते

गडद काळोखी जगात भरता
साथीस सदैव चांदणे असते
निबिड निर्जन गूढ वनात
पायी गुणगुण गाणे असते

तिची साथ असो नसो वा
तिच्याच साठी जगणे असते
कधीतरी नक्की भेटेन ती
म्हणून स्वप्न पाहणे असते

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



Amey abhyas sawant

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणारं :-

           कुणीतरी असाव
गालातल्या गालात हसणा रं
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसाणारं.

कुणीतरी असाव
आपल म्हणता येणारं
केल परक जगन
तरी आपल करून घेणारं .


पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.

अंतरीचे दुख व्यक्त करताना

हृदय माझे भरून आले
जीवनाची व्यथा सांगताना ,
नयनी अश्रू ढळू लागले .