मनात धरावे एक ध्येय

Started by vikrams13, September 08, 2016, 11:01:07 AM

Previous topic - Next topic

vikrams13


मनात धरावे एक ध्येय

मनात धरावे एक ध्येय
आणि पेटून उठावे त्याच्या पूर्तीसाठी
संकटना न डगमगता फक्त लढावे
त्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी

लक्ष्य हे माहीत आहे पण
रस्ता अवघड असेल
पण संकटे कधी व कसे येतील
हे आपल्याला माहित नसेल

ह्यात कधी अपयश हि येईल तरी
न डगमगता परत प्रयत्न करावा लागेल
कितीवेळा तरी ध्येय जवळ दिसत असताना
कितीवेळा तरी हारावे लागेल

पण ध्येय मिळवण्यासाठी
परत उठून उभे राहावे लागेल
परत उठून त्या यशाच्या
आनंदासाठी परत उठून उभे राहावे लागेल.

                   - विक्रम सरक

Vnsarak