मी मराठी ..

Started by k.suhas, September 08, 2016, 03:46:56 PM

Previous topic - Next topic

k.suhas

मी मराठी ..
सरस्वतीचे स्वर मी
आहे मला लक्ष्मीचे रूप
शक्तीचे सामर्थ्य माझ्यात
आहे निसर्गाशी एकरूप .... मी मराठी ..

ओंकाराचे अक्षर मी
आहे गणेशाची विद्या
मर्यादा पुरोषोत्तम ची वाचणे मी
तुकारामाची मी गाथा ....... मी मराठी ..

पावसाची रिमझिम मी
कोकिळेची मंजुळ वाणी
केसरीची मी सिंह गर्जना
गोदावरीचे खळखळणार पाणी ....... मी मराठी ..

ज्ञानेश्वरांची लेक मी
झाली तुकोबाची लाडली
विठ्ठलाच्या वारीतून मी
घरा घरात पोहचली...... मी मराठी ..

छत्रपतींची तालावर मी
केलं स्वराज्याचे स्वप्न साकार
मराठी मानून मन मिळवला
झाल लोकशाहीचा जय जय कार .... मी मराठी ..
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com