स्वार्थी

Started by गणेश म. तायडे, September 11, 2016, 08:51:36 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

हरवल्या आहेत चांदण्या
आकाशातील आता
दिसतो नुसता काळा धूर
डोळ्यांसमोर आता

लहानपणीचा खेळ
हरवला आहे आता
तारे मोजण्याच्या शर्यती
संपल्या आहेत आता

नद्यातील पोहण्याची कला
कोण शिकतोय आता
झाडांवर चढून फळे
कोण खातोय आता

फिरते चक्र निसर्गाचे
बिघडले आहे आता
स्वार्थी माणसाचा स्वार्थ
सारेच संपवत आहे आता

खाणे पिणे बनले विषारी
बळ कुठून येईल आता
नद्यांची पात्रे झाली
कारखान्यांची गटारे आता

प्रगतीच्या चढाओढीत
कुठे येऊन पोहोचलो आता
मागे वळून पाहता
दिसतो फक्त सर्वनाश आता

- गणेश म. तायडे, खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com