पाखरांस ....

Started by Asu@16, September 11, 2016, 12:30:51 PM

Previous topic - Next topic

Asu@16

        पाखरांस ....

तुझ्याचसाठी होते बांधले
घरटे सुंदर वृक्षीं टांगले
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मी
झुलत राहिले नभांगणी
       पाखरा, येशील कां परतुुनि
जन्म दिला, तव नटले थटले
पंखी बाळ देण्या झटले
आयुष्याच्या वाटेवर मी
चालत राहिले रात्रंदिनी
       पाखरा, येशील कां परतुुनि
येता बळ तव पंखी
झेप घेतलीस सागरलंघी
घरट्यामध्ये वृक्षावर मी
वाट पाहते अंती अजुनि
       पाखरा, येशील कां परतुुनि
नाती कसली, माती सगळी!
दुनिया अपुली असे वेगळी
मरणाच्या वाटेवर मी
वन्ही देण्या तू स्मशानी
       पाखरा, येशील कां परतुुनि

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita