वाट माझी .....?

Started by Ashok_rokade24, September 11, 2016, 06:47:55 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

वाटे मध्ये काटे आहेत की ,
काट्यांमधून वाट जात आहे ,
जिथे पडते पाऊल माझे ,
जखम खोलवर होत आहे ,

सुखासाठी डाव मांडीला ,
दान नित ऊलटेच पडले ,
हरलो सुख आयुष्य भराचे ,
दुखः घेऊन जगत आहे ,

जिथे पडते पाऊल माझे ,
जखम खोलवर होत आहे ,

कितीही जीवाचा त्रागा केला ,
भाव मनीचा परि न ऊमजला ,
रक्ताचेही माझे नाते दुरावले ,
एकांती  साथीला अश्रू आहे ,

जिथे पडते पाऊल माझे ,
जखम खोलवर होत आहे ,

वाटेतील काचेचा एक तुकडा ,
शिरपेचात बसवूनी घेतला ,
रक्ताने सारे नहाले मस्तक ,
तरिही घेऊन मिरवत आहे ,

जिथे पडते पाऊल माझे ,
जखम खोलवर होत आहे

दुखःमनीचे सांगावे कुणाला ,
कुणीही न राहीले साथीला ,
विसरून शेज मृदूल फुलांची ,
सरणावर काटेरी जाणे आहे ,

जिथे पडते पाऊल माझे ,
जखम खोलवर होत आहे .
                 
                    अशोक  मु. रोकडे .
                    मुंबई  .