काय करावे......?

Started by Ashok_rokade24, September 11, 2016, 06:57:46 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

कधी कधी असे वाटते ,
मीच मला स्वतःला शोधावे,
पण असे कधी घडतच नाही ,
अस्तित्व माझे सापडत नाही ,
त्याला काय करावे ?

कधीकधी असे वाटते ,
बाहेर पडून सुख आपले शोधावे ,
पण दोन पावले गेल्यावर आपसूक ,
वाट माझी घराकडेच वळते ,
त्यला काय करावे ?

कधीकधी असे वाटते,
विचार कुणाचा कधी करू नये ,
पण समस्या त्यांच्या समोर येता ,
आपलेच मन द्रवून जाते ,
त्याला काय करावे ?

कधीकधी असे वाटते  ,
शिवून ओठ गप्प बसावे ,
पण चुकीच्या मार्गातून थांबविण्या,
शब्द बाहेर येती आपसूक ,
त्याला काय करावे ?

कधीकधी असे वाटते,
कोरडे पाषाण ह्रदय करावे ,
पण आठवणींच्या बरसातीने ,
मन चिंब भिजून जाते ,
त्याला काय करावे ?

कधीकधी असे वाटते,
सारे सोडून मुक्त व्हावे ,
परंतू मन आपले माणसाचे ,
ओढ त्यांचीच घेत रहाते ,
त्याला काय करावे ?

          अशोक मु. रोकडे.
           मुंबई.